ब्रह्माकुमारीजच्या ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार – प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या माउंट आबू राजस्थान मुख्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नंदुरबार जिल्ह्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारातर्फे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्याभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी स्वातंत्र्यदिना पर्यंत विविध देशभक्तीपर उपक्रम राबविले जाणार आहेत. सन 2022 हे वर्ष भारत सरकार संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करीत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ब्रह्माकुमारीज् संस्थेने `स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` या विषयावर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ज्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यंटन मंत्रालयाच्या सहकार्याने ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाांचे आयोजन करण्यात येईल.ब्रह्माकुमारीज् देशव्यापी कार्यक्रमाचे राष्ट्रीय उद्घाटन गुरुवारी सकाळी 10 वाजता संस्थेचे मुख्यालय, शांतीवन, माउंट आबू येथील विशाल डायमंड सभागारात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाले.

याप्रसंगी पंतप्रधानांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.. यावेळी भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् महासचिव बी.के. निर्वेर आणि कार्यकारी सचिव बी.के. मृत्युंजय यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात करण्यात आले. माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीज् संयुक्त मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी संतोषदीदीजींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.ऑनलाईन लिंक: http://bkinfo.in/amritmahotsav असल्याची माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराचे उत्तर महाराष्ट्र माध्यम समन्वयक जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे, आणि नंदुरबार जिल्हा मीडिया समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!