नंदुरबार – येथील रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एक वरून दोन वर रेल्वे रूळ ओलांडतांना ताप्ती गंगा छपरा-सूरत 19046 क्रमांकाच्या एक्सप्रेसने जबर धडक दिल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ताप्ती गंगा छपरा गाडी नंदुरबार स्थानकावर आली. यावेळी अंदाजे 35 वर्षे वय असलेल्या अज्ञात युवकाने रेल्वे रूळ ओलांडतांना एक्सप्रेसने जबर धडक दिली. या अपघातात युवकाच्या डोक्याला जबर फटका बसला. तात्काळ रेल्वे विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली .यावेळी तातडीने जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. नंदुरबार रेल्वे पोलीस आणि ,वाणिज्य विभागातीलअधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी युवकाला,पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली अग्रवाल यांनी घोषित केले.नंदुरबार रेल्वे स्थानकावर वेळोवेळी ध्वनीक्षेपकाद्वारे रेल्वे रुळावरून प्रवाशांनी जाऊ नये असे सांगण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून,प्रवासी नाहक आपला जीव गमवावतात. रेल्वे विभागाच्या सूचना कक्ष आणि वाणिज्य विभागातर्फे वेळोवेळी प्रबोधन करण्यात येते. मात्र रेल्वे रूळ ऐवजी पादचारी पुलाचा उपयोग करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दुपारी झालेल्या अपघाताची नोंद पोलिसात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.