ब्रेकिंग..लटकलेल्या स्थितीत एकाच झाडावर आढळले दोन तरुणांचे मृतदेह; शहादा तालुक्यात खळबळ

नंदुरबार – शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेले आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह कुजलेले असल्यामुळे घटना घडून बराच कालावधी उलटल्याचे स्पष्ट दिसत असून ही आत्महत्या आहे की घातपात, याचा संदर्भ पोलिसांना अद्याप मिळालेला नाही.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 31 मार्च 2022 रोजी सकाळी शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात डोंगरा लागतच्या सुनाट जंगल भागात एका झाडावर दोन युवकांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलीस पाटील यांना मिळाली. ती माहिती त्यांनी तातडीने शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बुधवंत यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन आनोळखी युवक ठिबक सिंचनच्या एकाच  नळीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी ओळख पटवून देणारे कागद अथवा मोबाईल वगैरे काही सापडले नसल्याचेेे सांगण्यात आले. गावातल्या लोकांनाही ओळख पटलेली नाही. यामुळे हे दोन्ही तरुण कोण? कोणत्या गावाचे आहेत? इकडे आडरानात कसे आले? त्यांंनी एकत्र गळफास घेतला की दिला गेला? असे अनेक प्रश्नन उपस्थित झाले आहेत. दरम्यान शहादा पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. जाहीर केलेल्यााा वर्णनात म्हटले आहे की, एकाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, जिन्स पँट, पायात काळि चप्पल व दूसरा युवक सावळ्या रंगाचा, अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळि जिंस पायामध्ये निळा बुट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!