नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील विसरवाडी एज्युकेशन विसरवाडी सार्वजनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांची सिनेट सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भरत गावित हे भारतीय जनता पार्टीचे नवापूर तालुक्यातील नेते आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या अधिसभा (सिनेट) सदस्य पदासाठीच्या निवडणुकीसाठी विसरवाडी येथील विसरवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित विसरवाडी सार्वजनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची सिनेट सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे,