नंदुरबार – भाजपच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकपदी (उत्तर महाराष्ट्र) भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष असताना विजय चौधरी यांनी केलेल्या कुशल संघटनाची दखल घेऊन त्यांना पुन्हा प्रदेश स्तरावर संधी देण्यात आल्याचे मानले जाते.
आगामी काळातील कार्यक्रम, सभा व देशभरातील निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, तसेच केंद्रातील भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री, पदाधिकारी देशभर प्रवास करणार आहेत. हा प्रवास नियोजनबद्ध व गुणात्मक, संख्यात्मकदृष्ट्या चांगला होण्याच्या दृष्टिकोनातून प्रदेश स्तरावर केंद्रीय नेता प्रवास योजना समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून चार प्रमुख व्यक्तीची नियुक्ती केली असून, यात विजय चौधरी यांचा समावेश आहे.