नंदुरबार – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे हे दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची तसेच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिली.
अधिक माहिती देताना विजय भाऊ चौधरी यांनी सांगितले की, राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे पूर्व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. , त्यामुळे त्यांच्या जागी ओबीसींचा चेहरा असलेले चंद्रकांत जी बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर नंदनगरीत त्यांचे प्रथमच आगमन होत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले असून त्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि महत्त्वपूर्ण चर्चा होईल. त्याचबरोबर सामाजिक संवाद, बुथ कार्यकर्त्यांशी संवाद, युवा शाखेचे उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश राहील. त्याप्रसंगी भव्य बाईक रॅली काढून नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येईल, असेही याप्रसंगी विजय भाऊ चौधरी यांनी नमूद केले. या दौऱ्याविषयी तसेच त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी चार वाजता विजयपर्व येथे आयोजित करण्यात आली आहे . राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित खासदार डॉक्टर हिनाताई गावित आमदार राजेश पाडवी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करतील, तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील विजय भाऊ चौधरी यांनी केले.