नंदुरबार – नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित होण्यास सुरू झाले असून माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भगिनी डॉक्टर सुप्रिया गावित कोळदे गटातून 1369 मतांनी विजयी झाल्या आहेत. 12 हजार 563 मतांपैकी 6 हजार 707 मते त्यांना मिळाली. येथे शिवसेनेच्या आशा पवार 5 हजार 339 मते मिळून पराभूत झाल्या.
अक्कलकुवा आणि खापर गटात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत यात खापर गटातून आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री एडवोकेट के सी पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी गटातून सुरय्या मकरानी या विजयी झाल्या आहेत.
होळ तर्फे हवेली गणात भाजपाच्या सिमा मराठे 2688 मध्ये घेऊन विजयी झालेल्या शिवसेनेच्या स्वाती मराठे 2576 मते प्राप्त होऊन पराभूत झाल्या.
खोंडामळी गटात भाजपाच्या शांताराम पाटील 87 मतांनी जिंकले त्यांना एकूण 7 हजार 77 मते मिळाली तर शिवसेनेचे गजानन पाटील 6990 मिळून पराभूत झाले