नवी दिल्ली – आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, भारतात दिल्या गेलेल्या कोविड-19 च्या लसमात्रांची संख्या 217 कोटी 11 लाखांवर (2,17,11, 36,934) पोहोचली आहे.
12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरण, 16 मार्च 2022 रोजी सुरू झालं. आतापर्यंत 4 कोटी 8 लाखाहून जास्त (4,08,74,582)मुलांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे. त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची खबरदारीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.
आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजार 342 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.10% आहे.
भारतात कोविडमुक्त होण्याचा दर 98.71% आहे. देशात गेल्या 24 तासात, 5,291 कोरोना रुग्ण बरे झाले आणि देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकूण संख्या 4,39, 78,271 इतकी आहे.
देशात गेल्या 24 तासात कोविड 19 च्या एकूण 3,39,062 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 27 लाखांच्या वर (89,27,28,070) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.73%, तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.61%.आहे.