वाचकांचे पत्र:
भारताला कमी लेखणारी जागतिक मानसिकता!
भाग्यनगर येथील ‘भारत बायोटेक’ने कष्ट करून विकसित केलेली
कोव्हॅक्सिन ही भारतीय लस आहे. मात्र फायझर आणि तत्सम परदेशी आस्थापनाने आणि भारतातील काहींनी कोव्हॅक्सिनला कमी दर्जाचे ठरवून तिला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळू नये याकरिता आटोकाट प्रयत्न केले; मात्र लसीच्या कंपनीने शर्थीने प्रयत्न करून तिला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिलीच हे वाखाणण्याजोगे आहे. पण त्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यातल्यात्यात भारतात लसीकरण करून आलेल्यांना ब्रिटनमध्ये जाणीवपूर्वक १० दिवस अलगीकरणात ठेवण्याचा नियम करण्यात आला; तेव्हा भारतानेही प्रत्युत्तरादाखल युरोपातून लसीकरण करून आलेल्यांना हाच नियम लागू केला, तेव्हा ब्रिटनला अद्दल घडली व त्याने तो नियम हटवला. जर्मनीच्या माजी राष्ट्रप्रमुख अँजेला मर्केल यांनी ‘भारत हे जगाचे औषधालय आहे’, असे सांगून भारत चा गौरव केला. जे अँजेला मर्केल यांना कळतं ते समजून घेण्यास आपण कुठे कमी तर पडत नाहीत ना ह्यावर सर्वांनीच चिंतन करूया.-
– डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ