वाचकांचे मत:
भ्रष्टाचाराने मिळविलेल्या धनाने
लक्ष्मीदेवी प्रसन्न होईल का ?
प्रति,
संपादक सााे.
कृपया प्रसिध्दीसाठी
प्रथम नरक चतुर्दशीनिमित्त वाचकमित्रांना आवर्जून सांगावेसे वाटते की, कोणताही सण अकारण नाही. पूर्वजांनी त्याविषयी सांगितलेल्या कथा आजच्या स्थितीत देखील दिशादर्शन करणाऱ्या आहेत. जसे की, नरक चतुर्दशी संदर्भात पुराणात सांगितले आहे की, नरकासुर स्त्रियांवर अत्याचार करीत असे. चतुर्दशीच्या पहाटे त्या नरकासुरास श्रीकृष्णाने ठार करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला. त्यावेळी स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला होता. आज स्त्रियांवर नानाविध अत्याचार होत आहेत. तेव्हा स्त्रीशक्ती जागृत करून त्रास देणाऱ्या नरकासुराला तुरूंगात टाकूया. आपला धर्म फक्त सहिष्णू नसून क्षात्रतेजाने षडरिपूंचा नाश करणारा आहे हे आपण नरकचतुर्दशीच्या निमित्ताने शिकूया !
धनत्रयोदशीचेही आपण महत्व समजून घ्यायला हवे. या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याची प्रथा आहे. जेणेकरून वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. तसेच या दिवशी ब्रह्मांडात श्रीलक्ष्मीदेवीचे तत्त्व पण प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा या जिवावर सतत टिकून राहावी यासाठी धन नैतिक मार्गाने मिळविणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराने मिळविलेले धन नेहमीच जीवनात दुःख घेऊन येत असते; त्यामुळे आपल्या घरात अशी कमाई तर येत नाही ना ह्याचे चिंतन करूया. आताच्या काळात सर्वांनाच शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे सन्मार्गाने जगून साधना करणार्या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला पाहीजे असे वाटतेय.
– डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ