नंदुरबार – मानव विकास मंत्रालय, दिल्ली येथे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत नविन शाळेची मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका संस्थाचालकाची तब्बल ६५ लाख रूपयात फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी धळे व नाशिक येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक हिरालाल पाटील (वय ६०) धंदा शेती रा. कुढावद ता. शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बन्सीलाला सखाराम सोनवणे, अमोल बन्सीलाल सोनवणे, दोन्ही रा. प्लॉट क्र.४५ श्रीराम कॉलनी, वाडीभोकर रोड, धुळे जि. धुळे आणि दीपक तुकाराम देवरे रा. महादेव हॉसिंग सोसायटी त्रिमुर्ती चौक, नाशिक, अशी गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.
या फसवणूक प्रकरण पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, जय देवमोगरा माता बहुउद्देशिय संस्था, कुढावद ता. शहादा जि. नंदुरबार या संस्थेच्या नावाने मानव विकास मंत्रालय दिल्ली येथून मॉडेल स्कुल सुरू करण्याची मंजुरी मिळवून देतो, असे आमिष दाखवत आरोपी बन्सीलाल सोनवणे, अमोल सोनवणे यांनी दिपक देवरे हा मानव विकास मंत्रालय, दिल्ली येथे वरिष्ठ अधिकारी असल्याची थाप मारली. नंतर 2013 पासून 2019 पर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी रक्कम घेत तिघांनी संगनमत करून एकूण 65 लाख रूपये लुबाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मंजुरी मिळवून दिली नाही म्हणून पाटील यांनी आरोपींकडे वारंवार ते पैैैसे परत करण्याचा तगादाा लावला. परंतु त्यांनी पैसे परत केलेच नाही. तेव्हा पाटील यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले म्हणून अखेर त्यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.