मंत्रोच्चार व विज्ञान

वाचकांचे पत्र :

 

मंत्रोच्चार व विज्ञान

आज संगणकाच्या युगामधेही संस्कृतची महानता आम्ही जानुणच आहोत. या तंत्रज्ञानाच्या युगातही संस्कृतचे महत्व तेवढेच मोठे आहे. संगणक तज्ज्ञांच्या मतेही संस्कृत संगणक प्रणालीसाठी सर्वोत्तम भाषा आहे. संस्कृत मंत्रांचे उच्चारण मानवाच्या शरीरावर व मनावर होणारे परिणाम ही अद्वितीय आहे. आज न्युरोसायन्स मधील संशोधनाने दाखवून दिले आहे की कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते. न्यूरोसायंटिस्ट जेम्स हार्ट झेल यांनी मांडलेल्या ‘संस्कृत इफेक्ट’ या संशोधनात त्यांनी केलेल्या व्यवसायिक पात्रता असलेल्या संस्कृत पंडितांच्या अभ्यासाने हे सिद्ध केले होते की वैदिक मंत्राचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक सहकार्यशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. यावरून आपल्या परंपरेने सांगितलेले सिद्ध होते की मंत्रांचे स्मरण करणे आणि पठण करणे स्मरणशक्ती आणि विचार वाढवते. यातून संस्कृतची आयुर्वेदात अंतर्भूत केलेली महानता लक्षात येते. आज गरज आहे ती मोबाईल वेड्या होत चाललेल्या आमच्या तरुण पीढीला व लहान मुलांना मंत्रोच्चारांचे महत्व पटवून त्यांना ते करण्यास सांगणे व परत एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याची.

– डॉ०. पी. एस. महाजन, संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!