मकर संक्रांतीला एक कोटींहून अधिक जण सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होणार

नवी दिल्‍ली – स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत, 14 जानेवारी 2022 रोजी जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालय सज्ज असून एक कोटींहून अधिक लोक यात सहभागी होतील अशी अपेक्षा आयुष मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे.

कोविड-19 च्या पुन्हा वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, मकर संक्रांतीदिवशी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक अधिक प्रासंगिक आहे,असे आज आभासी माध्यमातून घेतलेल्या  पत्रकार परिषदेत आयुष मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. सूर्यनमस्कार चैतन्य आणि प्रतिकारशक्ती निर्माण करतो आणि त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यास सहाय्य्यकारी आहे, हे  सिद्ध झाले आहे. आम्ही कार्यक्रमात 75 लाख लोकांच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवले, मात्र नोंदणीचा प्रतिसाद आणि आमची तयारी पाहता, ही संख्या एक कोटींची मर्यादा ओलांडेल अशी अपेक्षा मला आहे, असे ते म्हणाले.

आयुष मंत्रालयाने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली  हा कार्यक्रम सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले.

या आभासी माध्यमातून झालेल्या पत्रकारपरिषदेत  आयुष राज्यमंत्री डॉ  महेंद्रभाई मुंजापारा म्हणाले की, सूर्यनमस्कार मन आणि शरीराला नवचैतन्य  देतो. मॉलिक्युलर जेनेटिक्सवर योगाभ्यासाच्या  प्रभावाचा अभ्यास केला जात आहे,” असे त्यांनाही सांगितले.

हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले. “ सूर्यनमस्कार चैतन्यदायी जीवनासाठी, सूर्यनमस्कार जीवन शक्तीसाठी आहे,असे त्यांनी सांगितले.

भारतातील आणि परदेशातील सर्व आघाडीच्या योग संस्था, भारतीय योग संघटना, राष्ट्रीय योग क्रीडा महासंघ, योग प्रमाणन मंडळ, फीट  इंडिया आणि अनेक सरकारी आणि बिगर -सरकारी संस्था या जागतिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.ख्यातनाम व्यक्ती आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी चित्रफीत संदेशाद्वारे सूर्यनमस्काराचा प्रचार करणे अपेक्षित आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे  खेळाडू आणि कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

यासाठी सहभागी आणि योगाभ्यासप्रेमी लोक संबंधित पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात आणि त्यांना 14 जानेवारी रोजी सूर्यनमस्कार करतानाची  त्यांची  चित्रफीत अपलोड करायची आहे. नोंदणीसाठीचे दुवे  संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि आयुष मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले  जात आहेत.

सहभागी होणारे आणि योगाभ्यासप्रेमी  खालील पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करू शकतात:

https://yoga.ayush.gov.in/suryanamaskar

https://yogacertificationboard.nic.in/suryanamaskar/

https://www.75suryanamaskar.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!