नवी दिल्ली – निर्धारित केलेल्या तासाच्या आधीच्या 48 तासांच्या कालावधीत टीव्ही किंवा तत्सम उपकरणांद्वारे कोणत्याही प्रकारचा निवडणूकविषयक मजकूर प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यापुढे मतदानाआधीच्या दोन दिवसात कोणत्याही उमेदवाराविषयी त्याच्या प्रचारा विषयी किंवा निकाल अंदाज विषयी वार्तांकन करता येणार नाही, असे झाले आहे.
आरपी कायदा 1951च्या 126 कलमात नमूद केल्यानुसार प्रसारमाध्यम वार्तांकनाबाबत हा निर्णय घेतल्याचे आयोगाने म्हटले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने गोवा, मणीपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवणुकांसाठी तैनात करण्यात येणाऱ्या निरीक्षकांना माहिती देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले. या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक 8 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले होते. या राज्यांमध्ये निवडणुकांचे आयोजन खालील वेळापत्रकानुसार होणार आहे.या संदर्भात सर्व प्रसारमाध्यमांचे जन प्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 कडे लक्ष वेधण्यात येत आहे. या कलमानुसार एखाद्या मतदारसंघात मतदानप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निर्धारित केलेल्या तासाच्या आधीच्या 48 तासांच्या कालावधीत टीव्ही किंवा तत्सम उपकरणांद्वारे कोणत्याही प्रकारचा निवडणूकविषयक मजकूर प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे.