मनसे चा अभिनव उपक्रम ‘मूर्ती आमची किंमत तुमची’

 

पुणे – मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठ येथे ४ सहस्र श्री गणेशमूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या श्री गणेशमूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील; मात्र त्याचे मूल्य नागरिकांनी ठरवायचे आहे, असेही त्यांनी घोषित केले आहे.

कोरोनाच्या काळातील आर्थिक संकट आणि श्री गणेशमूर्तीच्या अधिक किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना श्री गणेशमूर्ती घेणे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठ येथे ४ सहस्र श्री गणेशमूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या श्री गणेशमूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील; मात्र त्याचे मूल्य नागरिकांनी ठरवायचे आहे. नागरिकांनी श्री गणेशमूर्ती घेतल्यानंतर मंगल कलशात ऐच्छिक देणगी टाकून मूर्ती घेऊन जायची आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. मनसे नेते अमित ठाकरे हे या उपक्रमास भेट देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!