महत्वाचे ! सरकारी कर्मचाऱ्यांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी सादर करावे अन्यथा होईल फौजदारी

 

नंदुरबार : खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करुन क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेल्या तसेच ज्या उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे अशा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून ‘बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त ,ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करुन घेतली असेल अशा उमेदवारांनी तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे. अशा उमेदवारांनी मुळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा टपालाद्वारे 31 मे 2022 पुर्वी समर्पीत करावा. अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल. मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!