वाचकांचं मत:
महान कवयित्री संत बहिणाबाई
प्रति,
मा. संपादक,
कृपया प्रसिद्धीसाठी
वारकरी संप्रदायांच्या संत कवियत्री बहिणाबाईंचा जन्म वैजापूर तालुक्यातील देवगाव येथे सौ. जानकीबाई व श्री आऊजी कुलकर्णी या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचा विवाह बालपणीच श्री. रत्नाकर पाठक नावाच्या बीजवराशी झाला होता. परमार्थ व भक्तीची ओढ लहानपणापासूनच असणाऱ्या संत बहिणाबाई कथा- कीर्तन, पुराण श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात रममाण असायच्या. त्या संत तुकाराम महाराजांना गुरु मानत असत. त्यांची प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांची भेट झाली नाही. एकदा संत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या वाचनात आला व त्यानंतर त्यांनी सात दिवस तुकाराम महाराजांचा ध्यास घेतला असता सातव्या दिवशी त्यांना तुकाराम महाराजांचा स्वप्न साक्षात्कार झाला व त्यातूनच बहिणाबाईंचा लौकिक लोकांपर्यंत पसरला. त्यांच्या अभंगातून त्यांचे गुरु संत तुकाराम महाराज व गुरुपरंपरेचे वर्णन आपल्याला दिसून येते. संत बहिणाबाईंनी अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या असे मिळून 732 रचनांची निर्मीती केली आहे. विठ्ठलावर निस्सीम भक्ती असणाऱ्या संत बहिणाबाई नित्य विठ्ठलाच्या दर्शनाकरिता वारीला जात असत. संत बहिणाबाईंना संत रामदास स्वामींनी दिलेल्या हनुमानाच्या मूर्तीने यांच्या हातून तीर्थ पिल्याची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. आजही ही मूर्ती शिरूर येथील त्यांच्या निवासस्थानी आहे. जीवनातील सुख दुःखाकडे स्थिरतेने पाहत जगण्यातून कळलेले तत्वज्ञान त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये होय. त्यांच्या रचनेत सहजपणे दिलेली जीवनाची शिकवण दिसून येते त्या म्हणतात –
आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर।
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर।।
त्यांच्या काव्या मधून आपल्याला समाजव्यवस्था व संस्कृतीचे सुंदर दर्शन पाहायला मिळते.
घट फुटलियावरी । नभ नभाचे अंतरी ।।
हा त्यांचा शेवटचा अभंग 2 ऑक्टोबर 1700 साली त्या शिरूर येथे समाधिस्त झाल्या. अशा या महान संत कवियत्री संत बहीणाबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः वंदन.