नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांचे म्हणणे मांडण्याकरीता ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, सदस्या श्रीमती उत्कर्षा रुपवते, श्रीमती.दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवार 10 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात महिलांच्या तक्रारींवर जनसुनावणीचे आयेाजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीत जिल्ह्यातील सर्व तक्रारदार, पीडित महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरुपात घेवून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.
सदर जनसुनावणीस तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी कोणत्याही पीडित महिला पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकतील. तसेच पोलिस विभागाकडील महिला व मुलांकरीता असलेल्या सहाय्य कक्षाकडे प्राप्त असलेली प्रकरणेही सदर जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहेत. जनसुनावणीत विधीसेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी, पोलिस विभागाकडून तत्काळ सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक 02564-210047 ) येथे संपर्क साधावा.