नंदुरबार – माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाणीपुरवठा करणे जमत नसेल तर आम्हाला सोपवावे आम्ही रोज पुरेसे पाणी पुरवून दाखवतो; असे जाहीर आव्हान माजी आमदार शिरीष चौधरी आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून दिले. त्याच बरोबर धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना चंद्रकांत रघुवंशी हे पाणी कपात करुन शहरवासीयांना नाहक वेठीस धरताहेत आणि दमात घेण्यासाठी पालिकेचा गैरवापर करण्याचा गुंडपणा खऱ्या अर्थाने तेच करीत आहेत; असा गंभीर आरोप केला.
शहरातील मोकाट जनावरे आणि अनारोग्याविषयी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेल्या फलकबाजीने मोठ्या वाक् युद्धाला तोंड फोडले आहे. फलकबाजीला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या खास शैलीत बोचरे उत्तर दिल्यानंर आज भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा आपल्या खास स्टाईलमध्ये प्रतिउत्तर दिले. हिरा एक्झिक्यूटिव्ह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरीष चौधरी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व नगरपालिकेतील भाजपाचे विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी हे आरोप केले. याप्रसंगी नगरसेवक आनंद माळी, संतोष वसईकर, गौरव चौधरी व अन्य उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या प्रारंभी मोकाट जनावरांच्या झुंजीत मरण पावलेले व्यापारी अग्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आरोपांना उत्तर देत माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, जनावरांच्या झुंजीत व्यापारी मरण पावला असताना ते तिकडे कशासाठी गेले होते वगैरे अशोभनीय प्रश्न उपस्थित केले म्हणून तसेच गुंड संबोधत गोरक्षकांविषयी अवमानकारक वक्तव्य केले म्हणून आम्ही सर्वजण निषेध नोंदवतो.
कुत्रे आणि मोकाट जनावरे नगराध्यक्षांचे आहेत का? हा प्रश्न करणे त्यांना शोभत नाही. या सेवा शहरवासीयांना देणे नगरपालिकेला पर्यायाने सत्ताधाऱ्यांना अधिनियमानुसार बंधनकारक आहे. असे असतांना त्या विषयी फलक लावणाऱ्यांना गुंड संबोधतात. आपल्याच नगरसेवकाच्या बांधकामाला बेकायदेशीर ठरवून नोटीस बजावणारे रघुवंशी अर्थपूर्ण मध्यस्थी झाल्या नंतर त्याच कामाला कायदेशीर असल्याचे ठरवून परवानगी देतात, हीच खरी मोठी गुंडगिरी आहे; असा सनसनाटी आरोप याप्रसंगी शिरिष चौधरी यांनी केला. ते पुढेेे म्हणाले की, चंद्रकांत रघुवंशी यांनी गंमतबाजी सोडून आता गांभीर्याने कायदेशीर तेच बोलले पाहिजे. त्यांनी 187 सर्वे क्रमांक वरील श्रीराम मंदिराची जागा परत करावी, मग पावित्र्याचाा आव आणावा; असे सांगून शिरीष चौधरी पुढे म्हणाले की , शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करून दोन दिवसा आड पाणी देण्याचा निर्णय त्यांनी केला. केवळ नगराध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे आणि नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हेेे संकट ओढवले असून हा शहरवासीयांना वेठीस धरण्याचाच प्रकार आहे. एकीकडे पाटबंधारे अधिकारी नगरपालिकेला पाणी उचलण्या संबंधित टेंडर भरण्याचे वारंवार स्मरण देत असतात परंतु नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत असते. रघुवंशी यांच्या फार्म हाऊस ची जमीन बुडीत जाऊ नये यासाठी धरणात जमा होणारे पाणी सोडून दिलेे जाते. अशा सर्व कारणाने पाणीकपातीचा निर्णय त्यांनी घेतला आहे, असे शिरीष चौधरी म्हणाले.
लवकरच खड्डापुजन आंदोलन करू
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी थेट आव्हान देत सांगितले की पाणीपुरवठा करू शकत नसाल तर रघुवंशी यांनी जनतेची माफी मागावी आणि आम्हाला जबाबदारी सोपवावी आम्ही रोज पुरेसा पाणीपुरवठा करून दाखवतो हे आमचे जाहीर आव्हान आहे. शहराला रोज पाणी देता येईल इतके पाणी धरणांमध्ये आहे आणि शहराचे पाणीपुरवठा करणारे स्त्रोत देखील व्यवस्थित आहेत परंतु यांची इच्छाशक्ती नगरपालिकेचे नियोजन आणि नगराध्यक्षांची कार्यक्षमता पुरेसे नसल्यामुळे पाणीकपातीचे संकट लादले जात आहे. वारंवार उपस्थित होणारा मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाणार नसेल तर आम्ही लवकरच आंदोलन उभारू असे विजय चौधरी म्हणाले त्याच बरोबर शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे काम केले जात नसल्यामुळे लवकरच खड्डा पूजन आंदोलन सुरू करणार असल्याचे विजय चौधरी यांनी घोषित केले.
हा आहे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा गंभीर आरोप