नंदुरबार – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे आणि गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. हा अनोखा उपक्रम राबवून शिरीष कुमार मंडळाने राष्ट्रभावना जपण्याचा आदर्श ठेवला; असे मत याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
येथील बालवीर चौक परिसरात आज झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रथम पेटकर दाम्पत्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.त्यानंतर माजी सैनिकांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली.यावेळी माजी सैनिक सुनील मुंडे, राजेश गिरणार ,अशोक वाघ यांचा भारत मातेची प्रतिमा,तुळशी रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी विजय साळुंखे यांनी कोरोना काळात शवविच्छेदनासह हजारो मृतदेह पॅकिंग केले.यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास वंजारी सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सहकार्याध्यक्ष देविदास पेटकर ,वंजारी समाज महिला आघाडीच्या सहसचिव सुरेखा देविदास पेटकर, उपाध्यक्ष सरिता अनील कागणे ,सचिव विद्या राहुल गाभणे, संघटक सोनाली शैलेंद्र गवते, डॉ.काणे प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा महिरे, कृषी अधिकारी अनिल कागणे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, शिक्षक राहुल गाभणे उपस्थित होते,.देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे संचलन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले.संयोजन ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी.एस.गवळी, गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक यादबोले, उपाध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य कैलास ढोले, प्रा.एकनाथ हिरणवाळे, साहूल कुशवाह, सिद्धेश नागापुरे, काशिनाथ गवळी, सदाशिव गवळी यांनी संयोजन केले.* फोटो ओळी- नंदुरबार येथील शहीद शिरिषकुमार मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माजी सैनिकांच्या सन्मान प्रसंगी उपस्थित सुनील मुंडे ,राजेश गिरणार, अशोक वाघ, सोबत देविदास पेटकर, सुलभा महिरे, संभाजी हिरणवाळे, जी.एस.गवळी, अशोक यादबोले आधी