नंदुरबार – विजयादशमीच्या दिवशी येथील शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या उत्सवा प्रसंगी शहर संघचालक डॉ त्र्यंबक पटेल, प्रमुख पाहुणे डॉ निलेश वळवी , वक्ते श्री गणेश पाटील सर व बहुसंख्येने स्वयंसेवक उपस्थित होते
संघाचा विजयादशमी चा उत्सव का साजरा केला जातो या विषयावर प्रास्ताविक डॉ त्र्यंबक पटेल यांनी केले
प्रमुख पाहुणे डॉ निलेश वळवी यांनी संघाच्या राष्ट्र व समाजा साठीचे कार्य व संघाची शिस्त या विषयी कौतुक केले तसेच शतकीय वर्षाकडे होत असलेल्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
वक्ते प्रा.गणेश पाटील यांनी आपल्या बौद्धिक मध्ये रामायण, स्वामी विवेकानंद, भगतसिंग यांचे अनुभव कथन करीत भारत भूमीची महती मांडली. समाज पुढे शहरी नक्षलवादाचे आव्हान या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. या लढाईत पारंपरिक शस्त्रासोबत लेखणी व डिजिटल शात्रांचेही पूजन करण्याचा संकल्प घेणे आवश्यक असल्याचे म्हणाले. संपूर्ण संस्काराचे मंदिर म्हणजे शाखा, व्यक्तिनिर्माणाचे केंद्र म्हणजे शाखा असे म्हणत शाखा वाढीसाठी आवाहन केले. या उत्सवाला स्वयंसेवक, विविध पक्षातील राजकीय व्यक्ती व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी सगळ्यांनी शस्त्र पूजन केले