नंदुरबार – जिल्हा पोलीस दलाकडून कोरोना विषयक नियमांचे ऊल्लंघन करीत अधिक संख्येने लोक जमविणे तसेच वीनामास्क फिरणे अशा संदर्भाने दिनांक ०१ जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ या दोन आठवड्यात विनामास्कच्या एकूण २,०३४ केसेस करून ४,९३,४०० रुपये दंड वसूल करण्यांत आला आहे. तसेच 124 जणांवर 77 गुन्हे दाखल केले आहेत.
प्रत्येक पोलीस स्टेशनला ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट लावून विनामास्क कारवाया करुन दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर सुद्धा नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
नागरिकांवर असे गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळणेकामी अडचणी येऊ शकतात. त्यासाठी नागरिकांनी कोविड १९ अनुषंगाने शासन निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
त्यात एकूण नंदुरबार जिल्ह्यात दिनांक ०१ जानेवारी ते १४ जानेवारी २०२२ या दोन आठवड्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून कोरोना संदर्भात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी रेस्टॉरंट, उपहारगृहे व इतर आस्थापना चेक करुन शासन निर्देशाप्रमाणे ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त असलेले व नागरिकांनी कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल केले आहेत. ५० टक्केपेक्षा जास्त उपस्थिती असल्याने एकूण १२४ आयोजकां विरुद्ध एकूण ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाभरात सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी पोलीसांकडून नाकाबंदी करुन कसून तपासणी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आगामी काळात विवाह सोहळे तसेच सामाजिक/ धार्मिक/सांस्कृतिक/राजकीय कार्यक्रम/मेळावे/संमेलन या ठिकाणी देखील पोलीसांची करडी नजर असणार आहे. शासनाने दिलेल्या कोविड निर्देशांचा भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कोणतीही व्यक्ती मास्कशिवाय प्रवास करतांना आढळल्यास योग्यरित्या मास्क न घालता आढळल्यास सदर व्यक्तीसह वाहनचालकावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर सुद्धा नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
पहाटे ०५.०० ते रात्री ११.०० वा.पावेतो जमावबंदी असल्याने सदर वेळेत ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसमांनी गटागटाने फिरण्यास मनाई असल्याने तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच रात्री ११.०० ते पहाटे ०५.०० वा. पावेतो संचारबंदी असल्याने सदर वेळेत कोणीही व्यक्ती अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यात एखादी संस्था / आस्थापना ही कोविड अनुरुप वर्तन किंवा मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली किंवा एखाद्या व्यक्तीने संस्थेचा किंवा कोणत्याही आस्थापनाच्या आवारात नियमांचे उल्लंघन करतांना मिळून आल्यास पोलीस व महसूल पथकामार्फत संयुक्त कारवाई करून सदर संस्था / आस्थापना बंद केली जाईल.