मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून २०० गाड्यांच्या ताफा रवाना

नंदुरबार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील १५० बसेस व ५० लहान मोठ्या अशा २०० वाहनांमधून हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बसला झेंडा दाखवला.

याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक परवेज खान,शेतकरी सहकारी संघाचे संचालक भाऊसाहेब शिंत्रे, जि.प सदस्य प्रतिनिधी डॉ. सयाजीराव मोरे, जि.प माजी सभापती विक्रमसिंग वळवी, ज्येष्ठ शिवसैनिक ताराचंद माळसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास राठोड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज दसऱ्यानिमित्त मुंबई येथे बीकेसीमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने काल मंगळवार रोजी रात्री उशिरा रवाना झाले. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जि.प उपाध्यक्ष जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा दिवसापासून मेळाव्याच्या तयारीसाठी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या.

यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य हे मुंबई किंवा ठाणे पुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सरकार स्थापनेनंतर पहिलाच मिळावा असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी दसरा मेळाव्याला २०० बसमध्ये हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!