नंदुरबार- एनटी-बी प्रवर्गातील मेंढपाळ ठेलारी समाजाच्या विविध समस्या विधान सभेत मांडव्यात व एनटी-क मधील मेंढपाळ धनगर समाजाच्या सर्व योजनांचा लाभ तसेच ठेलारी वस्तींवर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, याबाबतचे निवेदन नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे शिक्षणमंत्री तथा प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना युवा ठेलारी संघातर्फे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशाला स्वातंत्र्य उलटून बरीच वर्ष झाली. परंतु एनटी-ब प्रवर्गातील मेंढपाळ ठेलारी भटका समाज अद्यापही शासनाच्या विविध योजनांपासून कोसोदूर राहिला आहे. ठेलारी समाजास विकासाच्या मूळ प्रवाहात आणावे, यासाठी राज्यमंत्री बच्चु कडू यांनी ठेलारी समाजाच्या वस्तीवर येऊन समाजाच्या जीवनामाचा सर्वे करावा असे केल्यास तुमच्या निदर्शनास येईल कि ठेलारी समाज आजही पाल देऊन राहत आहे अणि त्यानुसार ठेलारी समाज पालमुक्त योजना, ठेलारी वस्ती सुधार योजना मिळवुन देण्यासाठी आपले सहकार्य ठेलारी समाजाला मिळावे अशी मागणी ठेलारी समाजाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. सतत भटकंती असल्यामुळे मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही, ठेलारी समाजाच्या वस्तीवर शाळा नाहीत त्यामुळे ठेलारी समाजासाठी ठेलारी वस्तीवर शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी विधान सभेत ठेलारी समाजाच्या विविध समस्या मांडव्यात.यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन देतांना नंदुरबार जिल्हा ठेलारी समाजाचे सावळीराम करे, बापू खताळ, उत्तम मारनर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील आदी उपस्थित होते.