नंदुरबार – नंदुरबारचे नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी जातीय दंगली सारखे गंभीर गुन्हे घडवणाऱ्या एका टोळीतील 16 जणांना एकाचवेळी हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. नंदुरबार शहरातील एवढ्या संख्येने गुन्हेगार हद्दपार केले जाण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.
नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलेल्यांची नांवे अशी – गोविंद यशवंत सामुद्रे वय ३० (टोळी प्रमुख) रा. सिध्दार्थ नगर नंदुरबार, गोपी यशवंत सामुद्रे वय ३३ रा. सिध्दार्थ नगर नंदुरबार, आकाश रविंद्र अहिरे वय २७ रा. आंबेडकर नगर नंदुरबार, विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे वय २५ रा. समता कॉलनी नंदुरबार, गौतम मंगलसिंग खैरनार वय २७ रा. जुनी पोलीस लाईन नंदुरबार, भटु गोरख जाधव वय २४ रा. मेहतर वस्ती नंदुरबार, शेखर रमेश जाधव वय-२५ रा. मेहतर वस्ती नंदुरबार, दिपक शामा ठाकरे वय २२ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, मुकेश मधुकर ठाकरे वय २५ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, अक्षय अनिल वळवी वय २२ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, वंकर रतिलाल ठाकरे वय २६ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, शंकर रतन ठाकरे वय २५ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, सतिष ऊर्फ जिबला दिलीप वळवी वय २० रा. चिंचपाडा मिलाटी, नंदुरबार, सचिन शामा ठाकरे वय २२ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, राकेश राजेश ठाकरे वय २६ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार, अंबालाल जयसिंग ठाकरे वय २२ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार अशी आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असून हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाच्या आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघून जाणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच हद्दपार इसमांनी यापुढे नंदुरबार जिल्ह्यात येतांना पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांची तसेच न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक राहिल. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वरील १६ हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.