म्हशीने दिली बिबट्याशी झुंज; हल्ल्यातून वृद्धाचे वाचविले प्राण

 

बिबट्याच्या हल्ल्यात हात जायबंदी झालेला वृद्ध

 

नंदुरबार – मुके प्राणी प्रसंगी जीवाची बाजी लावतात आणि मालकाचे संरक्षण करून मालकाच्या प्रती इमान निभावतात; हे अनेक प्रसंगातून पाहायला मिळाले आहे. बिबट्याला शिंगावर घेऊन मालकाचे रक्षण करणारी म्हैस मात्र विरळीच म्हटली पाहिजे. चक्क म्हशींनी बिबट्याला शिंगावर उचलून फेकत बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यातून वृद्धाला वाचवण्याची घटना तळोदा तालुक्यात घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे, तळोदा शहरातील बादशाह अर्जुन भरवाड (वय 75) हे म्हशी चारण्यासाठी गेले असता दलेलपूर शिवारातील डिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात अचानक बिबट्या आणि त्याचे 2 बछडे त्यांच्यावर चालून आले. बादशाह भरवाड यांच्यावर बिबट्याने
हल्ला केला तेव्हा त्यांनी झटापट करायचा प्रयत्न केला . त्यावेळी बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताला जबर चावे घेऊन जखमी केले. दरम्यान झटापट करताना ते खाली कोसळले. जखमी वृद्धाने दिलेल्या माहितीनुसार ते खाली पडताच बिबट्या पुन्हा धावून आला त्यावेळी अचानक त्यांची म्हैस मदतीला धावून आली. बिबट्या त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात म्हशीने बिबट्याला चक्क आपल्या शिंगावर उचलून फेकत झुंज दिली. अन्य दोन म्हशी सुद्धा धावून आल्या आणि तिन्ही म्हशींनी पाहता पाहता झुझ करून बिबट्या व बछडे यांना पळवून लावले आणि वृद्धाचे प्राण वाचवले.

मागे यांच परिसरा एका १० वर्षा बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती नंतर एका शेतकऱ्याला जायबंदी केले होते. याबाबत वनविभागाने बिबटया जेरबंद करण्यासाठी पिजरा लावावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!