नंदुरबार – राजकारणात आल्यावर युवकांना दाबण्याचा प्रयत्न अनेकदा होत असतो. असे असले तरीही युवकांनी राजकारणात उमेद हारायची नसते. भरारी घ्यायची असते; असे सांगतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे तसेच सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
नंदुरबार येथे रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, युवा नेते ॲड राऊ मोरे,जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,चिटणीस जितेंद्र कोकणी,शहराध्यक्ष नितिन जगताप,तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड अश्विनी जोशी,डाॅक्टर सेल जिल्हाध्यक्ष डाॅ.नितिन पवार,जेष्ठ सदस्य डाॅ.जगदिश मराठे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष बबलु कदमबाडे,सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,युवक शहराध्यक्ष लल्ला पैलवान,युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी,शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे,पंकज पाटील,जगदिश माळी,रुपेश जगताप,मिलिंद जाधव,निलेश चौधरी,हेमंत बिरारे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक शहर कार्याध्यक्ष हाशिम अनिस शहा, संघटक जितेंद्र मंगु ठाकरे, सरचिटणीस अमोल पिंपळे,उपाध्यक्ष समिर रहिम बागवान,सदस्यपदी संजय मराठे यांची तर युवक तालुका कार्याध्यक्षपदी प्रमोद महाजन तसेच विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी डाॅ.जगदिश चौधरी,शहराध्यक्ष जयेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी डॉ.अभिजित मोरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा हा एकमेव पक्ष आहे की तो सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो. पक्षात कुठलीही वशिलेबाजी चालत नाही. पक्षातील आमदार राष्ट्रवादीला सोडून गेले तरी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी राज्यातील सरकार बनविले. जे कोणीच करू शकत नाहीये ते फक्त शरद पवार करू शकतात. कार्यक्रमाचे संयोजन युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे यांनी केले.