युवा सेनेतर्फे सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

नंदुरबार – पेट्रोल डिझेल आणि गॅस यांचे दर सातत्याने वाढत असून सामान्य माणूस मेटाकुटीला येऊ लागला आहे. याविरोधात शिवसेनेतर्फे आज महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून नवापूर शहरात महाराष्ट्र युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली तथा शिवसेना जिल्हाउप्रमुख हंसमुख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढ निषेधार्थ सायकल रॅली काढण्यात आली.

 नवापूर युवासेनेतर्फे आयोजित सायकल रॅलीला महात्मा गांधी पुतळयापासून सुरुवात करण्यात आली. सायकल रॅली लाईट बाजार, मेनरोड मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन सायकल रँलीची सांगता करण्यात आली. युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख दिनेश भोई, तालुका प्रमुख नरेंद्र गावीत, शहर प्रमुख राहुल टिभे, युवासेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख मनोज बोरसे, किशन सिरसाठ, मयुर पाटील, हर्षल माळी, भटु पाटील, रामु पवार, भरत माञे, दादु भोई, कमलेश गोसावी, युवराज पाडवी, बंटी पाटील, युवती सेना तालुका प्रमुख मनिषा नाईक, दिपीका नाईक, पुनम नाईक, कार्तीक ढोले, विशाल वळवी,करण गावीत,मनिष पाडवी,अजय पाडवी,सोम पाडवींसह युवासेनेचे पदधिकारी उपस्थित होते.
कोणताही अमुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ उपनिरीक्षक अशोक मोकळ आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!