नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाचे (DoRD) सचिव नागेंद्र नाथ सिन्हा, यांच्या नावाने secyrd.nagendranath@gmail.com हा बनावट ईमेल आयडी तयार करण्यात आला आहे आणि ग्रामीण विकास विभागाच्या विविध हितधारकांना फसवे ईमेल पाठवण्यात आले आहेत.
या बनावट आयडीवरून एक विशिष्ट ईमेल पाठवला जात आहे जो डेटा प्रो कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्प अंमलबजावणी संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय – ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) अंतर्गत असलेले प्रकल्प बंद करण्यासंबंधी आहे. हा फसवा ईमेल ग्रामीण विकास विभागाचे सचिव श्री नागेंद्र नाथ सिन्हा यांच्या नावाने खोट्या सहीनिशी विविध राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि कौशल्य परिसंस्थेतील इतर भागधारकांना पाठवण्यात आला आहे.
पुढे असे नमूद केले आहे की, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाकडून कोणताही अधिकृत संदेश अधिकृत वाहिन्यांद्वारे आणि gov.in किंवा nic.in सारख्या ईमेल डोमेनवरून जारी केला जातो. या अधिकृत डोमेन व्यतिरिक्त इतर डोमेन वरून आलेल्या ईमेलची सत्यता तपासली पाहिजे.