नंदुरबार – शिवसेनेच्या शाखा व कार्यालय हे मंदिरासमान असते या शाखेत प्रवेश करताना प्रत्येक शिवसैनिकाने आपापसातील मतभेद दाराच्या बाहेर पादत्राणांसोबत काढून प्रवेश करावा या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी केले
येथील डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धुळे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके जिल्हा समन्वयक दीपक गवते विजय पराडके युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री मिर्लेकर म्हणाले गरीब कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसैनिकांना दिला आहे संपूर्ण राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शाखा व कार्यालयाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवसैनिक अहोरात्र करत आहेत आज शहादा कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले असून या कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यास माझा शिवसैनिक वचनबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी मी देतो.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख असून त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाघांना आता हत्ती चे बाळ प्राप्त झाले असल्याने आदिवासी जिल्ह्यात अगदी शेवटच्या टोकापर्यंत शिवसेना पोहोचली असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण ही पोहोचले आहे नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समिती धडगाव नगर पंचायत आदि ग्रामीण भागात शिवसेनेचे सदस्य जनतेने निवडून दिले आहेत निश्चितच उशिरा का होईना या जिल्ह्यातील आदिवासी जनतेने शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला असून जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक या विश्वासाला पात्र राहतील
नंदुबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना
शहादा नगरपालिका निवडणूक शिवसेना लढणार असून शहाद्यात शिवसेनेला जनतेचे सहकार्य मिळेल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाशी सामना करताना शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे देशातील टॉप फाइव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे ही गौरवाची बाब आहे शिवसैनिकांनी मेहनती व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे कार्यकर्ता मजबूत झाला तर पक्ष मजबूत होईल व सर्वसामान्य जनतेची कामे मोठ्या प्रमाणात होतील
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता आणावी आणि येणाऱ्या काळात अभंग संपूर्ण जिल्हा भगवामय करण्याकरिता प्रत्येक शिवसैनिकाने जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले प्रास्ताविक नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार जिल्हा संघटक मधुकर मिस्तरी शहरप्रमुख रोहन माळी माजी नगरसेवक विनोद चौधरी भगवान अलकारी सुभाष पाटील धनराज माळी गणेश चित्रकथी बापू चौधरी सुरेश मोरे सागर डॉक्टर जितू दुबे हसमुख पाटील अनिल वारुळे रमेश कुवर व शहादा तालुक्यातील आणि शहरातील शिवसैनिकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.