रस्त्यांच्या दूर्दशेविषयी पोलिस अधीक्षकांनी घेतली संयुक्त बैठक; संबंधित अधिकाऱ्यांनी दिली तत्पर दुरुस्तीची हमी

 

नंदुरबार – जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा आणि वाढलेली अपघात प्रवणता यावर वृत्तपत्र आणि माध्यमांकडून सातत्याने मांडले जात असतानाही रस्ते आणि महामार्ग संबंधित विविध विभागप्रमुखांकडून कोणतीही कृतिशीलता दर्शविली गेली नाही. तथापि नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तेव्हा त्यांनी लवकरात लवकर दुरुस्त्या करण्यावर सहमती दर्शवली.

 

दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या दालनात नंदुरबार जिल्हयातील अपघात प्रवण क्षेत्राबाबत नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, कार्यकारी अभियंता (सा.बा.वि.), जिल्हा परिषद ( बांधकाम), जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथक इत्यादी विभागातील जिल्हयातील प्रमुखांची संयुक्तीकरित्या बैठक आयोजीत करण्यात आली होती.

या बैठकीत जिल्हयातील विविध रस्ते, राष्ट्रीय व महामार्गावरील वारंवार होणारे अपघात, अपघातांचे घटनास्थळ याबाबत चर्चा करण्यात आली. अपघातातील जिवीतहानी व मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानी बाबत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात व यापुढे अपघातामुळे होणारी जिवीत व वित्तहानी टाळण्याकरीता करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. अपघात प्रवण क्षेत्रात जिवितहानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्याकरीता दिशादर्शक फलक, स्पीड लिमीट बोर्ड, वळण रस्ता दर्शक फलक, रात्रीच्या वेळी अंधारात चमकणारे स्टड लावणे बाबत त्याच प्रमाणे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्डयांची डागडुज्जी करुन रस्ते दुरुस्त करणे बाबत संबधीत विभागाना योग्य सूचना देण्यात आल्यात.

ही बैठक पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस श्री. विजय पवार, अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार, श्री. सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार विभाग, श्री. श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा विभाग, श्री. संभाजी सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा विभाग, श्री. किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार, श्री. रविंद्र इंगोले (NHAI PIU DHULE), श्री. योगेश कुलकणी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार, श्री. सोमनाथ पवार, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, नंदुरबार, श्री. भावसार, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक शाखा, नंदुरबार, श्री. आर.एम.काझी, सहा. पोलीस निरीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, विसरवाडी अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!