नंदुरबार – डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे आज दि.22 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील गणिताचे शिक्षक श्री रणवीरसिंग पाडवी यांनी सुंदर चालीवर गणितातील महत्वाच्या संकल्पना वर आधारित गीत गायन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच विविध गणिताच्या क्लृप्त्या समजावून सांगितल्या.
प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रमोद सुर्यवंशी यांनी गणित कोडी सोडवायला दिली व मनोरंजन पध्दतीने गणित ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. यानंतर गणित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.गणित विषयावर आधारित आकर्षक रांगोळी प्रदर्शन व गणित साहित्य प्रदर्शन सुध्दा यावेळी भरवण्यात आले.
प्रारंभी थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यानंतर गणित प्रतिज्ञा सर्वांनी म्हटली. प्राथमिक शिक्षक श्री महेन्द्र निकवाडे व अशोक पाटील यांनी गुणाकार व भागाकार करण्याच्या काही सोप्या टीप्स, पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती वळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अशोक पाटील यांनी केले.