नंदुरबार – तहसिल कार्यालयात आज दिनांक 26/09/2022 रोजी दुपारी 4 वा. आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिनल करनवाल, प्र. सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकीत सिंग, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुप्रिया गावीत व जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अंतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करण्यांत आला.
त्यात तालुक्यातील शेतकरी आत्महत्या वारसांना दोन धनादेश, खरीप 2021 दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी यूनियन बैंक ऑफ इंडिया यांना रक्कम रुपये 5,94,85,000/- चा धनादेश, 7 विद्यार्थ्यांना जातीचे दाखले 12 शेतकऱ्यांना 7/12 व फेरफार, 10 स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिकेधारकाकडुन ऑनलाईन रक्कम स्विकारण्यासाठी क्युआर कोड, मौजे दहिदुले बु. येथील 10 शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत समाविष्ट करुन लाभ सुरु केल्याबाबतचे प्रमाणपत्र व मौजे चाकळे व धानोरा येथील 31 कुटुंबाना नविन केशरी शिधापत्रिका याप्रसंगी या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यांत आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व योजनेची थोडक्यात माहिती तहसिलदार नंदुरबार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. खासदार डॉ. हिना गावीत यांनी व मा. डॉ. विजयकुमार गावीत, मंत्री आदिवासी विकास तथा पालकमंत्री नंदुरबार यांनी सेवा सप्ताह साजरा करण्याचा मागचा उद्देश व योजनेची सविस्तर माहिती करुन दिली.
सदर कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्याकरीता नायब तहसिलदार श्री. भिमराव बोरसे, श्री. राजेश अमृतकर, रिनेश गावीत व रमेश वळवी तसेच नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. बागुल व श्री. माधव कदम प्राध्यापक जिजामाता महाविद्यालय नंदुरबार यांनी सहकार्य केले.