रॉयल्टी विचारल्यावरून ग्राम महसूल अधिकाऱ्याला थेट घरात घुसून धमकावले; रेती तस्करांची मुजोरी चर्चेत

 

नंदुरबार – रेती वाहतुक करणारे डंपर थांबवुन रॉयल्टीची (पावती) विचारणा केली एवढ्यावरून ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या थेट घरात घुसून त्याला सात आठ जणांनी धमकावले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून डंपर चालकांची व रेती तस्करांची मुजोरी चर्चेत आली आहे.

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दि. २८/०१/२०२५ रोजी दुपारी ही घटना घडल्याचे ग्राम महसुल अधिकारी हरीष बाळु पाटील रा. नंदुरबार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीत म्हटलेल्यानुसार घटनेचा तपशील असा की, नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण ते काकर्दा रोडवर रेती वाहतूक करणाऱ्या डंपरला (क्र. MH- ३९ AD- १०५५) ग्राम महसुल अधिकारी हरीष बाळु पाटील यांनी थांबवुन चालकाकडे रॉयल्टी (पावती)ची विचारणा केली. त्याप्रसंगी चालकाने “रवि पवार यांचेशी बोला” असे बोलून बेदरकारपणे न जुमानता डंपर पुढे दामटले आणि कोणतेही अधिकृत कागदपत्र न दाखवता रेतीने भरलेली डंपर घेऊन पसार झाला. हर्षल पाटील यांनी डंपर अडवण्याचा मनात राग ठेवुन रात्री 8.30 वा. विकास पवार हे सहा ते सात जणांसोबत गैरकायदयाची मंडळी जमवुन अचानक घरात घुसले. आमची गाडी का अडवलीस, असे विकास पवार याने दरडावून विचारले. तु पुन्हा आमची गाडी अडवलीस तर तुला खोटया गुन्हयात अडकवुन टाकेल व पोलीसात तक्रार दिली तर जिवे ठार मारुन टाकेल, अशी धमकी देत शिवीगाळ देखील करण्यात आल्याचे फिर्यादीत हरीश पाटील यांनी म्हटले आहे. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब रेवगडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!