नंदुरबार – जागतिक महिला दिन म्हणजे घरातील गृहिणीपासून तर विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरवाचा व सत्काराचा दिवस. स्त्री ही मुलगी, बहीण,पत्नी,आई, आजी अशा विविध भूमिका आपल्या जीवनात साकारते त्यातून ती आपल्या परिवारासाठी, समाजासाठी, सर्वांसाठी झटत असते. आज एकविसाव्या शतकात स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सर्वच क्षेत्रात भरारी घेताना पाहून आनंद होतो मात्र काही ठिकाणी आजही स्त्रियांना कमी लेखले जाते तेव्हा खंत वाटते. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त एवढेच सांगेन स्त्रियांना धन ,संपत्ती, पैसा हे काही हवे नसते त्यांना हवे असते ते आपुलकीचे किंवा प्रेमाचे दोन शब्द आणि यातच त्यांचा खरा सत्कार व गौरव हा होत असतो म्हणून त्यांच्याशी प्रेमाने वागा त्यांना वैचारिक स्वातंत्र्य द्या, त्यांचा आदर करा व त्यांना कमी न लेखता पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्या असे मत हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री आण्णासाहेब पि.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन निमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका व माजी नगरसेविका सौ अनिता चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित संस्थेचे सचिव तथा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.रुपेश चौधरी यांनी आपल्या भाषणातून सामाजिक,राजकीय, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करत महिला दिनानिमित्त संस्थेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
सहकारमहर्षी श्री अण्णासाहेब पि.के.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्रा.गणेश पवार यांनी प्रास्ताविक सादर करत विद्यार्थ्यांना महिला दिनाची माहिती दिली तसेच स्त्रीभ्रूण हत्या या विषयावरील एक गीत सादर केले.
महिला सत्कारार्थी श्रीमती नैना सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाची माहिती देत कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा उजाळा करून दिला व सत्कारार्थी महिलांच्या वतीने आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी सत्कारार्थी महिला म्हणून हिरा फाउंडेशन च्या संचालिका सौ.प्रणिता नरेंद्र चौधरी ,संस्थेतील सर्व महिला शिक्षिका, प्राध्यापिका सौ.रेणुका पेंढारकर ,प्रा.माधुरी पवार ,प्रा.रेखा कुवर ,प्रा. राजश्री राजपूत, प्रा.राणी शेख ,प्रा.रेखा कोकणी, प्रा.पूजा हिरणवाडे उपस्थित होते. सर्व सत्कारार्थी महिला मान्यवरांचा पुस्तकरुपी भेटवस्तू देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले व कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.निधी दामोदर व कु.रंजीता ठाकरे या विद्यार्थिनींनी केले व आभार प्रदर्शन श्री युवराज भामरे यांनी केले तर यशस्वीतेसाठी सहकारमहर्षी श्री.अण्णासाहेब पि के पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिराचे सर्व शिक्षक व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.