नंदुरबार – येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातून 13 शिक्षकांना रोटरी गुणवंत शिक्षक पुरस्कार तर 2 संस्था चालकांना गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून रोटरी क्लब नंदनगरी च्या माध्यमातून दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन कुठलाही प्रस्ताव न मागवता स्थापन केलेल्या समितीच्या निरीक्षणातून गुणवंत शिक्षकांची निवड केली जाते. त्यातूनच 2022 या वर्षाच्या रोटरी गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी 13 शिक्षकांसह 2 संस्था चालक यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती रोटरी क्लब नंदननगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, सचिव किरण दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन मनोज गायकवाड यांनी कळविले आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली नावे याप्रमाणे – प्रा.डॉ.दिलीप रामभाऊ जगताप (जी.टी.पी. महाविद्यालय नंदुरबार), सुनील वसंत भामरे (मुख्याध्यापक जीवन विद्या माध्यमिक विद्यालय बोरचक ता. नवापूर), हिम्मतराव काशीराम चव्हाण (मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल अक्कलकुवा ता. अक्कलकुवा), धर्मेंद्र भानुदास भारती
(श्री आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण, ता.जि.नंदुरबार), केशव रामचंद्र राजभोज (हि. गो.श्रॉफ हायस्कूल नंदुरबार), शेख शब्बीर मोहम्मद मंसुरी (माध्यमिक शिक्षक नॅशनल हायस्कूल ता.तळोदा), श्रीमती अर्चना छबुगिरी गोसावी (राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार), सुनील नारायण सोनवणे (जि.प.शाळा शेगवे, ता.नवापूर), भारती प्रकाश रनाळकर (जि.प.शाळा, अंबारीबार ता.अक्कलकुवा), यशवंत भटू बोरसे (मोहनसिंग क. रघुवंशी प्राथमिक शाळा, नंदुरबार), शिरीष पवार (नगरपालिका शाळा क्रमांक 4, नंदुरबार), सुरेश नरसई पटेल (के.डी.गावित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोरीट ता. शहादा) तर गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून संजय साहेबराव भामरे (महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल नंदुरबार) यांचा समावेश आहे.
याशिवाय शिक्षण क्षेत्रात संस्थाचालकांच्या भूमिकेतून मोलाचे कार्य करणाऱ्या संस्थाचालकांना देखील शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या माध्यमातून गौरविण्यात येते. यंदा हिरा प्रतिष्ठान नंदुरबार चे अध्यक्ष डॉ.रवींद्र हिरालालजी चौधरी व नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार चे अध्यक्ष परीक्षित मोडक यांना गुणवंत संस्था चालक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी देखील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या माध्यमातून विविध संस्था चालकांना गौरविण्यात आले आहे. ज्यात नंदुरबार तालुका विधायक समितीचे मनोज रघुवंशी, जिजामाता शिक्षण संस्थेचे डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादाचे प्रा.मकरंद नगीन पाटील, श्री गोवर्धनसिंगजी शैक्षणिक सेवा समिती,नंदुरबार चे पुष्पेंद्र गोवर्धन रघुवंशी यांना गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
शिक्षण क्षेत्रातील सदर पुरस्कारासाठी शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच सामाजिक योगदानाची देखील दखल घेण्यात आली आहे असे अध्यक्ष अनिल शर्मा व सेक्रेटरी किरण दाभाडे यांनी कळविले आहे. या वेळी रोटेरियन युवराज पाटील, रमाकांत पाटील, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली, दिनेश साळुंके, डॉ. विशाल चौधरी, निलेश तंवर, असिस्टंट गव्हर्नर शब्बीर मेमन, डिस्ट्रिक्ट लिटरसी हॅपी स्कूल चेअरमन नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येईल असे कळविण्यात आलेआले आहे.