लसीकरणात भारत एकमेव आघाडीवर; माध्यमांचे अहवाल दिशाभूल करणारे 

 

नवी दिल्ली – भारताचा राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रम हा जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात विशाल लसीकरण कार्यक्रम ठरला आहे. असे असतांना काही माध्यमांनी भारतात लसीकरणाचे लक्ष्य न गाठल्याचा दावा करणे सुरु ठेवले आहे. माध्यमांचे अहवाल दिशाभूल करणारे आहेत, असे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने याविषयी म्हटले आहे की, एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वृत्तात, भारताने लसीकरणाचे लक्ष्य साध्य न केल्याचा दावा करण्यात आला आहे.  हे वृत्त  दिशाभूल करणारे आहे आणि सत्य  नाही.

16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहीमेचा आरंभ  झाल्यापासून भारताने पात्र नागरिकांना पहिल्या लसीच्या 90% आणि दुसऱ्या लसीच्या 65% पेक्षा जास्त मात्रा दिल्या आहेत.  या मोहिमेमध्ये, भारताने जगात अभूतपूर्व असे अनेक टप्पे गाठले आहेत, ज्यात 9 महिने इतक्या  कमी कालावधीत 100 कोटी मात्रा देणे, एकाच दिवसात 2.51 कोटी मात्रा देणे आणि अनेकदा, एकाच दिवशी 1 कोटी मात्रा देणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत, भारताने कोविड लसीकरण करण्यात उत्तम कामगिरी बजावली असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93.7 कोटी (RGI नुसार) पात्र प्रौढ नागरिकांचे  लसीकरण  करण्याचे  उत्तम कार्य केले आहे.

इतर  विकसित राष्ट्रांच्या लसीकरणाशी  तुलना खालीलप्रमाणे आहे:

देश पहिला टीका दूसरा टीका
संयुक्त राज्य अमेरिका 73.2% 61.5%
ब्रिटेन 75.9% 69.5%
फ्रांस 78.3% 73.2%
स्पेन 84.7% 81%
भारत 90% 65%

पात्र लोकसंख्येला पहिली मात्रा देण्याच्या बाबतीत, यूएसएच्या  फक्त 73.2% लोकसंख्येचा समावेश होतो,, यूकेच्या  75.9% लोकसंख्येचा समावेश होतो, फ्रान्सच्या 78.3% लोकसंख्येचा समावेश होतो,आणि स्पेनच्या  84.7% लोकसंख्येचा समावेश केला आहे.  भारताने या सर्वांच्या आधीच पात्र लोकसंख्येपैकी 90% लोकांना कोविड-19 विरूद्ध लसीची पहिली मात्रा देण्यात उद्दिष्ट गाठले आहे.

त्याचप्रमाणे, लसींच्या दुसऱ्या मात्रेबाबत, यूएसएने आपल्या लोकसंख्येच्या केवळ 61.5%, यूकेने 69.5% लोकसंख्येचा, फ्रान्सने 73.2% लोकसंख्येचा आणि स्पेनने 81% लोकसंख्येचा समावेश केला आहे. परंतु  भारताने पात्र लोकसंख्येपैकी 65% पेक्षा जास्त लोकांना कोविड-19 विरुद्ध लसीची दुसरी मात्रा दिली आहे.

याव्यतिरिक्त भारतातील 11 पेक्षा जास्त राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी याआधीच 100%पात्र नागरिकांना लसीकरणाची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे, तर 3 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आधीच कोविड-19 विरूद्ध 100% पूर्ण लसीकरण (पहिला आणि दुसरा डोस दोन्ही) साध्य केले आहे.  अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेश लवकरच 100% लसीकरण पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

     कोविड-19 विरुद्धच्या  भारताच्या लढ्याला आणखी बळकटी देत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) डिसेंबर 2021 मध्ये दोन अतिरिक्त लसींना मंजुरी दिली आहे. यामध्ये मर्यादीत  वापरासाठी बायलाॅजिकल ई-ची कोर्बेवॅक्स (Biological -E’s CORBEVAX) लस आणि SII ची COVOVAX लस यांचा समावेश आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत, भारतात मर्यादीत  वापरासाठी असलेल्या लसींची संख्या ८ वर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!