नंदुरबार – येथील आदर्श मराठी विद्यामंदिराचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी चैतन्य भटू बोरसे याने औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आदर्श मराठी विद्यामंदिराच्यावतीने प्राचार्य सौ.सुषमा शहा मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी भदाणे, गुजराथी विभागाचे मुख्याध्यापक भद्रेश त्रिवेदी व पूर्ण कर्मचारीवृंदाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आंध्रप्रदेश येथील महाबलिपुरम येथे होणाऱ्या पुढील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केल्या बद्दल व आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाल्या बद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याला क्रीडा शिक्षक नंदू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले