लाच घेतांना आदिवासी विकास महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

नंदुरबार – येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहायक अजय किका पाडवी (वय – ४० वर्ष) आणि चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे (वय-४७ वर्ष) यांना एका शेतकऱ्याकडून ५००० रुपये लाच स्विकारतांना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याया पथकाने रंगेहात पकडले.
यातील मुळ तक्रारदार हे शेती व्यवसाय करतात. तक्रारदार यांची करणखेडा गाव शिवारात नंदुरबार रोडवर गट नं २७ व ११२ मध्ये ३० एकर शेत जमिन आहे. सदर शेती तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर आहे. सन २०२१ मध्ये दिवाळीच्या सुमारास निघालेली अंदाजे २०० क्विंटल ज्वारी त्यांच्या करणखेडा येथील त्यांचे गोडावून मध्ये ठेवलेली आहे. सदर ज्वारी खराब असल्याचे सांगून तुझी ज्वारी तु विकू शकत नाही, असे नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहायक अजय किका पाडवी आणि चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे यांनी सांगितले व तुला जर ज्वारी विकायची असेल तर प्रति क्विल २०० रूपये प्रमाणे द्यावे लागतील, अशी मागणी केली. तडजोडीअंती प्रती क्विंटल ५० रूपये लागतील अशी मागणी केली. ती ५००० रु लाचेची रक्कम आज दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी टोकरतलाव ता. जि. नंदुरबार येथील धान्य गोदामात स्विकारली. त्यावेळी पंचसाक्षीदारां समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक, समाधान महादु वाघ,  पोलिस हवालदार उत्तम महाजन, विजय ठाकरे, विलास पाटील, पोलिसनाईक अमोल मराठे, चिले, महाले या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणी अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम लाच मागत असतील, तर अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयाशी दूरध्वनी नंबर (०२५६४) २३०००९, मोबाईल नंबर. ८८८८८०५१०० व टोल फ्री क्र. १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करपान ब्युरो, नंदुरबार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!