लुपिन फाऊंडेशनमार्फत शेती उपयुक्त वनराई बंधारे उपक्रम

नंदुरबार – तालुक्यात कोळदा परिसरातिल ३२ गावांमध्ये लुपिन ह्यूमन वेलफेअर आणि रिसर्च फाऊंडेशन अंतर्गत सुधारित कापूस आदर्श पद्धत रुजविण्याचे काम सुरू आहे. त्या बरोबरच आज पर्यन्त १५ वनराई बंधारे बांध घालून त्या गावातील वाहून जाणाऱ्या पाण्याला मुबलक प्रमाणात शेतीकडे वळविण्याचे देखील काम केले आहे.
लुपिन ह्यूमन वेलफेअर आणि रिसर्च फाऊंडेशनकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, गावो गावी कापूस लागवड केलेल्या शेतकाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहिती मार्गदर्शन कार्यक्रम सुरू आहे. प्रकल्पाचे मार्गदर्शक तत्व जैवविविधतेचे रक्षण करणे आणि पाणी व्यवस्थापन या तत्वा नुसार गावो गावी वनराई बंधाराचे काम सुरू आहे. पावसाचे पडणारे पडणारे पाणी गावातील नदी नाल्याच्या प्रवाहत वाहून जाते. त्या पाण्याचा शक्यतोवर शेतकाऱ्यास बघवा तसा काहीच फायदा होत नाही, मग पाणी तर वाहून जात आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आडवायचे कसे यांचेच एक ताजे उदाहरण म्हणजे तुपिन फाऊंडेशन ने हाती घेतलेला हा वनराई बंधाऱ्याचा उपक्रम शेतकाऱ्यास नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. वाहून जाणारे नदी नाल्याचे पाणी अगदी कमी खर्चात शिमेन्ट च्या रिकाम्या गोन्या चा वापर करून रिकाम्या गोन्या मध्ये माती, रेती भरून नदी नाल्यावर आज पर्यन्त १५ वनराई बंधारे बांध घालुन वाहून जानाऱ्या पाण्याला मुबलक प्रमाणात अडवले जात असून त्याच पान्याच्या मदतीने शेतकरी रबी हंगामात एक पीक नक्कीच घेऊ शकेल. यात मात्र काही उणीव नाही. सदर वनराई बंधारे कोळदा शिवारत लुपिन फाउंडेशन चे अविनाश बोरसे पी यू व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू सदर उपक्रम हा लुपिन फाऊंडेशन वे विभागीय प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, प्रकल्प आहे. व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, जिल्हा प्रकल्प समन्वयक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबण्यात येत आहे वनराई बंधारा करिता सर्व कृषि मित्रांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!