नंदुरबार – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व भारतीय जनता पार्टीच्या येथील नगरसेवकांनी त्यांच्या वार्डातील कामांसाठी स्वतंत्र नीधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
याविषयी अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथि गृह, मुंबई येथे आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, चंदू पटेल आदींनी नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान नंदुरबार नगरपरिषदेच्या शहरातील रखडलेल्या विविध विकास कामांसाठी तसेच भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले असल्याची माहिती या नगरसेवकांकडून देण्यात आली.