जळगाव – ट्रॅक्टरमधून तापी नदीतील वाळू वाहतूक करू देण्यासाठी तसेच वाहनावर कारवाई करू नये यासाठी दरमहा 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव येथील पथकाने मुसक्या आवळल्या. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज 16 फेब्रुवारी रोजी ही धडक कारवाई केली.
याविषयी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मितावली, ता.चोपडा जि.जळगाव येथील एक ट्रॅक्टरधारक तापी नदीतील ऊपसा झालेल्या वाळूची वाहतूक करायचे काम करतो. ट्रॅक्टरवरती तापी नदीमधून वाळू वाहतूक करू देणेसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये दर महिन्याला देण्याची मागणी देवगाव सजेवरचे तलाठी भुषण विलास पाटील, वय-32 व्यवसाय-नोकरी, , तलाठी कार्यालय .
रा.पंकज नगर,चोपडा, ता.चोपडा हे करीत असल्याची तक्रार या ट्रॅक्टर धारकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी चोपडा तहसील कार्यालय आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदार ट्रॅक्टर धारकाकडे तलाठी भुषण विलास पाटील यांनी पंचासमक्ष दरमहा 10,000/-रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली व पहिला 10,000/-रु.लाचेचा हप्ता स्वतः पंचासमक्ष तहसिल कार्यालय चोपडा आवारात स्वीकारला. जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांनी व सापळा लावून बसलेल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लगेचच झडप घालत अटक करून गुन्हा नोंदवला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्र अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांनी ही कारवाई केली.
सापळा रचून कारवाई करणाऱ्या पथकात स्वतः जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, निरिक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील व सुरेश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पोलिस नायक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांचा समावेश होता.