विजेत्यांना केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 प्रदान

नवी दिल्ली –  क्रीडा मंत्रालयाने आज  दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या सर्व विजेत्यांना पुरस्कार  प्रदान केले. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 च्या सर्व विजेत्यांना या पूर्वीच  रोख पारितोषिके मिळाली होती मात्र कोविड-19 महामारीमुळे  क्रीडा पुरस्कार सोहळा आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आला होता  त्यामुळे  मागील वर्षीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना चषक आणि प्रशस्तीपत्र प्रत्यक्षरीत्या प्रदान करण्यात आली नव्हती..या कार्यक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्यासह क्रीडा सचिव श्रीमती  सुजाता चतुर्वेदी, युवा व्यवहार सचिव श्रीमती उषा शर्मा आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे  अधिकारी  उपस्थित होते.

29 ऑगस्ट 2020 रोजी, क्रीडा मंत्रालयाने 5 राजीव गांधी खेलरत्न आणि 27 अर्जुन पुरस्कारांसह एकूण 74 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले.

सोमवारी आयोजित  समारंभात राणी रामपाल, विनेश फोगट आणि  मरियप्पन थंगवेलू हे  प्रतिष्ठेचा  खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि लव्हलिना बोर्गोहेन, इशांत शर्मा, अतनु दास, सात्विक साईराज रंकीं  रेड्डी, चिराग चंद्रशेखर शेट्टी,या अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंसह अनेक पुरस्कार विजेते उपस्थित होते

पुरस्कार विजेत्यांना संबोधित करताना श्री अनुराग ठाकूर म्हणाले, “सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांना  भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.पुरस्कार विजेत्यांचा प्रवास इथेच संपलेला नाही, त्यांना अजून खूप काही साध्य करायचे आहे.आपण प्रतिभावान खेळाडूंचा शोध सुरू ठेवला पाहिजे, त्यांना तयार केले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यासाठी  सक्षम केले पाहिजे. त्यामुळे, मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की, भविष्यात भारतासाठी पदके जिंकू शकतील अशा किमान पाच खेळाडूंना तयार करण्याचा  आणि त्यांना प्रशिक्षित करण्याचा  देण्याचा वसा घ्यावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!