नंदुरबार – तालुक्यातील वावद येथील रहिवासी विशाल तानाजी लगडे या विद्यार्थ्यांने बळसाणे तरवाडे येथील यात्रेत प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करून कुस्ती स्पर्धेत यश मिळविले. जिल्हास्तरीय कुस्तीसह राज्यात यश मिळवण्याचे ध्येय असूनअस्सल मराठमोळी मातीतील कुस्तीची परंपरा कायम राखण्याचा मानस विशाल लगडे याने याप्रसंगी व्यक्त केला. विशाल लगडे हा महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा संघटक राजेंद्र लक्ष्मण लगडे यांचा पुतण्या आणि वावद येथील दूध व्यावसायिक तानाजी लक्ष्मण लगडे यांचा मुलगा आहे.विशाल लगडे याने कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.