विशेष दखल घेत पंतप्रधान मोदी यांनी खासदार डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसाला दिल्या विशेष शुभेच्छा !

नंदुरबार –  आवास योजना, हर घर बिजली, उज्वला गॅस  यासारख्या योजनांचा लाभ पोहोचवून तसेच रेल्वे सुविधा मिळवून देणे, कोट्यवधी रुपयांचा रस्ते विकास करणे यासारखे रचनात्मक काम करून नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात रचनात्मक विकास कार्य करणाऱ्या खासदार म्हणून संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांची दिल्ली दरबारात नेहमीच वाहवा होत असते. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषतखल घेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यामुळे गावित परिवाराच्या समर्थकांचा देखील उत्साह द्विगुणित झाला आहे.
“वाढदिवस कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य नव्या उत्साहाने पार पाडण्याची प्रेरणा देतो. येणाऱ्या काळात तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी नव्याने समर्पणाने झटत राहा.” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिका दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात प्रभावी नेता अशी प्रतिमा बनली आहे. मात्र जागतिक पातळीवर आणि देशात सुद्धा आपला प्रभाव राखणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकहितार्थ झटणाऱ्या सामान्य व्यक्तींच्या आणि लोकप्रतिनिधींच्या लहान सहान गोष्टींची दखल घेऊन आनंद व्यक्त करत असतात. त्यावर व्यक्त होऊन प्रेरणा द्यायला विसरत नसतात. हे देशभरातील जनतेने अनेकदा पाहिले आहे.  त्यांच्या मन की बात उपक्रमातून शेकडो तशी उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसाची विशेष दखल घेऊन शुभेच्छापत्र देणे त्यापैकीच मानले जात आहे.
हा आहे मोदीजींच्या पत्रातील मजकूर:
हिना विजयकुमार गावित जी,
तुझ्या वाढदिवशी तुला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि शुभेच्छा. मी तुमच्या जीवनात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.
भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी वाढदिवस हा एक खास प्रसंग आहे. त्याच वेळी, हा दिवस आपल्याला आपल्या कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य नव्या उत्साहाने पार पाडण्याची प्रेरणा देतो. येणाऱ्या काळात तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी नव्याने समर्पणाने झटत राहा.
तुम्हाला उत्तम आरोग्याने भरलेले दीर्घायुष्य लाभो. मी पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
हार्दिक शुभेच्छा,
तुझा,
(नरेंद्र मोदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!