नंदुरबार : नंदुरबारातील टिळक रोडवर राहणारे ५७ वर्षीय व्यापारी वसंतलाल रोहिल हे हरवले असून नातलगांसह पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. त्यांचे वर्णन जाहीर करण्यात आले आहे व ज्यांना आढळतील त्यांनी ताबडतोब संपर्क करावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
हे आढळल्यास त्वरित कळवा:पोलिसांचे आवाहन
वसंतराय हरिलाल गोहिल (५७) हे आपल्या दुचाकीसह २५ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले. त्यांची दुचाकी शहादा परिसरात प्रकाशा बॅरेज जवळ बेवारस स्थितीत सापडल्याने गुढ वाढले आहे. प्रयत्न करूनही त्यांचा शोध मात्र लागू शकला नाही. कुणाला काही माहिती मिळाल्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
वसंतराय यांचा मुलगा मोहीत वसंतराय रोहील, वय-31 यांनी दिलेल्या माहितीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी 5934/2021 क्रमांकाने हरविल्याची झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वडिल वसंतराय हरिलाल रोहील (वय 57 वर्षे) हे दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास होंडा कंपनीची अॅक्टीवा मोटार सायकल क्रमांक MH-39-E 8090 हिच्यात पेट्रोल टाकण्यासाठी देसाई पेट्रोल पंपावर जावून येतो असे सांगून गेले. परंतु घरी परत आले नाहीत. हरवलेले वसंतराय हरिलाल रोहील, वय 57 वर्षे हे बॉम्बे कुशींगवालेजवळ, टिळक रोड वाचनालय मागे, नंदुरबार येथील रहिवासी असून त्यांची उंची- 165 इंच, बांधा-सडपातळ, चेहरा गोल, रंग गोरा, केस लांब व काळे, अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व गुलांबी रंगाचा फुलबाहीचा शर्ट, असे वर्णन आहे. त्यांना मराठी, हिन्दी, गुजराती, अहिराणी, बोलता येते. तरी ज्यांना आढळून येतील त्यांनी नंदुरबार शहर पो.स्टे. 02564-222200 व पोलिस तपासी अंमलदार 09823346948 या क्रमांकावर संपर्क्क साधावा, असे आवाहन पोलीस ठाणे तर्फे करण्यात आले आहे. तपास हवालदार अतुल बिऱ्हाडे करीत आहेत.