शनिमांडळच्या राष्ट्रवादी संवाद मेळाव्यात गरजू लाभार्थींना मार्गदर्शन, शालेय साहित्याचेही वाटप

नंदुरबार- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दादा मोरे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शनिमांडळ येथे परिसंवाद व कार्यकर्ता शिबीर आणि लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावे, यासाठी अर्ज वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन तिलालीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर देवराम पाटील यांनी केले होते. यावेळी नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील, ऍड.प्रकाश भोई, जितेंद्र कोकणी, पंकज पाटील, बबलु कदमबांडे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नितिन जगताप व ऍड.प्रकाश भोई यांनी आज देशाला शरद पवारांच्या विचाराची गरज असल्याचे सांगितले. यानंतर जि.प.शाळा तिलाली येथील गरिब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपंग, विधवा, शेतमजूर, जेष्ठ नागरीक यांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  सुमारे शंभरावर अर्ज भरुन घेण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन संबंधितांना लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचेही मधुकर पाटील यांनी संागितले. कार्यक्रमास माजी सरपंच दिलीप पाटील, ग्रा.पं.सदस्य जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष वासुदेव माळी यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!