शनिवारपासून डायरेक्ट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा

नाशिक – ग्रामीण भागातील खेळाडूंना व्हॉलीबॉलसाठी व्यासपीठ तयार व्हावे या उद्देशाने शनिवारपासून डायरेक्ट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन महाजे (दिंडोरी )येथे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन, नाशिक जिल्हा महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन, आणि डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील महाजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवार पासून या स्पर्धा होत असून देशातील विविध राज्यांतील संघ यात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डी बी साळुंके यांनी दिली आहे. या वेळी प्राचार्य दिपक मोकल ,जनरल सेक्रेटरी,सरपंच महाजे वसंत रंगनाथ भोये , योगेंद्र दोरकर,राज्य संघटक शरद कदम उपस्थित होते.

दुर्गम भागात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब,हरियाना,चंदिगड,गुजरात,दिवदमण, उत्तराखंड,उत्तर प्रदेश,कर्नाटक,बंगाल,ओरिसा , आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मणिपूर, महाराष्ट्र,गोवा येथून येणाऱ्या खेळाडूंच्या ४० संघाची राहण्याची व्यवस्था ननाशी येथील आश्रमशाळेत केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम क्रमांक 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक 11 हजार आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. उद्घाटन समारंभाला विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ ,खा. हिना गावित , राष्ट्रीय अध्यक्ष विपीन चहल ,महासचिव विक्रम सिंह उपस्थित रहात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!