नंदुरबार :- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली असून त्यांना या बाबतचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) कुलगुरू व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ प्रमोद येवले यांच्या शिफारशीनुसार डॉ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.पवार यांचा अनुभव, संशोधन आणि कार्याची दखल घेऊन सदर विद्यापीठाने त्यांची विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ.एस.पी.पवार हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे अधिसभा (सिनेट) सदस्य असून विद्यापीठात फार्माकोग्नसी व फायटोकेमिस्ट्री या विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या औषधनिर्माणशास्त्रच्या संशोधन आणि मान्यता समितीच्या व या विभागाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन पद त्यांनी भूषविले आहे. त्यांचे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त शोध निबंध तसेच संशोधन यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक परिसंवाद, कार्यशाळा आणि परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना पंचवीस वर्षापेक्षा जास्त औषधनिर्माणशास्त्रच्या (फार्मसी) च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव असून डॉ. पवार यांना अनेक महाविद्यालयात आमंत्रित शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी आमंत्रित केलेे जाते. आता पर्यंत एकूण 9 पी.एच.डी. (पदव्युत्तरपदवी) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कार्य केले असून त्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. पूर्ण झाले असून 8 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच पदव्युत्तर (एम.फार्मसी) च्या अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी (रिसर्च प्रोजेक्ट) मार्गदर्शन केले आहे व 10 पेक्षा जास्त पुस्तकांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन झाले आहे. त्यांचा ह्या संपूर्ण कार्यशैली व अनुभवामुळे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) कुलगुरू व फार्मसी कॉउन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ पी.जी.येवले, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील यांनी डॉ पवार यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य व प्राध्यापक वृंद तसेच कर्मचारी वृंद यांनी प्राचार्य डॉ.पवार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.