नंदुरबार – पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून पाण्यात लवकर विरघळणाऱ्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती स्थापनेचे महत्त्व आता गणेश भक्तांना चांगलेच कळाले आहे त्यामुळे वर्षागणिक शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढत असून नंदुरबार येथे सुद्धा शाडू मातीच्या मूर्तींची आतापासूनच मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू झालेली आहे.
नंदुरबार हे गणेश मूर्तींसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. परंतु बदलत्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची क्रेझ निर्माण झाली आणि मातीच्या गणेश मूर्तींची बाजारपेठ जवळपास संपुष्टात आली होती. परंतु मागील पंधरा वर्षात घराघरात धर्मशास्त्र रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेने आणि हिंदू जनजागृती समितीने शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करण्याविषयी केलेली जनजागृती परिणामकारक ठरली. त्यामुळे नंदुरबार येथे शाडू मातीची मूर्ती स्थापना करणाऱ्या गणेश भक्तांची संख्या वाढली असून यंदा देखील शाडू मातीच्या मूर्तींची मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सालाबादप्रमाणे यंदाही पेंण येथील प्रसिद्ध श्री गणेश कला केंद्राच्या शाडू मातीच्या आकर्षक मूर्ती नंदुरबार येथे विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील देसाईपुरातील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरासमोरील गुरुकृपा लाकडी घाणा यांच्याकडे विशेष पद्धतीने साकारलेल्या आकर्षक गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. गुरुकृपा लाकडी तेल घाणा चे संचालक राहुल मराठे या मूर्तींचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की, आमच्याकडे मूर्तीशास्त्र व अध्यात्मशास्त्र यांचा अभ्यास करून बनवलेल्या मूर्ती आहेत. या गणेशमूर्ती पेण येथील पर्यावरणपूरक आणि १०० टक्के शाडू मातीच्या तर आहेच, परंतु श्रीगणेशाप्रती भाव जागृत करणाऱ्या आणि पाण्यात लवकर विरघळणाऱ्या आहेत. सात्विक गणेश मूर्ती ठराविक आहेत तरी आपली मागणी आजच बुक करा, असेही आवाहन त्यांनी केले.